प्रत्यक्ष‎ कृतीतून पर्यावरण रक्षणासाठी‎ पुढाकार घेतला पाहिजे : प्रा. मंजुताई चंद्रिकापूरे


सडक अर्जुनी, दिनांक : ०४ जानेवारी २०२३ : डोंगरगाव/खडकी येथे गाव व परिसरातील महिलांच्या सहकार्याने हळदी – कुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आले. सण-समारंभातून आपल्या‎ संस्कृतीच्या रक्षणाबरोबरच‎ पर्यावरण रक्षणाची जबाबदारी‎ घेतली पाहिजे. आपले सण-उत्सव‎ हे पर्यावरणपूरक आहेत. या‎ सणा निमित्त एकत्र आलेल्या‎ महिलांनी आपल्या उन्नत्तीसाठी‎ प्रयत्न करण्याची गरज आहे.‎ महिलांच्या विकासासाठी‎ महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे‎ आहे. एकमेकींचे सुख-दु:ख वाटून‎ घेऊन मदतीचा हात दिला गेला‎ पाहिजे. त्याच प्रमाणे सामाजिक‎ दायित्व जपण्याचे कामही झाले‎ पाहिजे. पर्यावरणाबाबत आपण‎ फक्त सोशल मीडियावरच‎ कॉपी-पेस्ट करतो, परंतु प्रत्यक्ष‎ कृतीतून पर्यावरण रक्षणासाठी‎ पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपण,‎ वृक्षसंवर्धन, प्लॅस्टिक बंदी अशा‎ उपक्रमातून आपण पर्यावरण रक्षण‎ करू शकतो, असे प्रतिपादन प्रा.मंजुताई चंद्रिकापूरे यांनी केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

प्रा.मंजुताई चंद्रिकापूरे ‎यांच्या वतीने हळदी-कुंकू‎ कार्यक्रमा निमित्त महिलांना वाण‎ म्हणून पर्यावरणपूरक कापडी‎ पिशव्यांचे वितरण करण्यात आले.‎ त्यावेळी प्रा.मंजुताई चंद्रिकापूरे बोलत होत्या.‎ यावेळी छाया टेकाम, मेश्राम ताई प. स सदस्य, शर्मिला चिमणकर सरपंच खडकी, दखणे ताई, राजगुडाचे सरपंच सुषमा मरस्कोल्हे,‎ मडावी ताई राजगुडा आदी उपस्थित होत्या.‎ मंजुताई चंद्रिकापूरे म्हणाल्या,‎ “प्रभागातील नागरिकांना सर्वोतोपरी‎ सुविधा पुरविण्यासाठी आपण‎ प्रयत्नशील आहोत. विविध‎ विकासकामांच्या माध्यमातून‎ प्रभागाचा विकास साधला जात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.
त्याचप्रमाणे विविध‎ सण-उत्सव नागरिक-महिलांसह‎ साजरे करुन त्यांच्यात चैतन्य‎ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात‎ आहे.

आजच्या हळदी-कुंकू‎ कार्यक्रमात विविध वस्तूंचा वाटप‎ करुन पर्यावरण रक्षणाबाबत जागृती‎ करण्याचा प्रयत्न केला आहे.‎ संजना मेश्राम, वृंदावनी मडावी, आसाराम मेश्राम, पुष्पा पाटनकर, सकुनबाई उईके, कलाबाई मेश्राम, नीरंनलता गहाणे, संध्याबाई कोसरकर, चंपा,मेश्राम, कल्पना सुरसाऊत, शालिनी मेश्राम, वच्छला शेंडे, सुरेखा देशमुख, देवांगना गावतुरे, अंतिमा टांगले, पुर्णकला गहाणे, आशा उईके, संगीता खंडाते, नेहा वाडीवा व गाव परिसरातील २०० पेक्षा अधिक महिलांनी या‎ सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा‎ दिल्या.‎


 

Leave a Comment