सत्ता असो वा नसो मी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. : खा. प्रफुल पटेल


भंडारा, दिनांक : २३ जानेवारी २०२३ : ग्राम पंचायत विकासाची पहिली पायरी आहे. जनतेने गावाच्या विकासासाठी आपल्याला निवडून दिलेले आहे. याचे ध्यान ठेऊनच विकासा करिता कोणतेही राजकारण आड येऊ न देता तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यानी ग्रामविकासाची जबाबदारी घ्यावी विकासाकरीता आम्ही तुमच्या सोबतीला आहोतच आपण ग्राम विकासाची कास धरू असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले. आज २१ रोजी पवनी तालुक्यातील अक्षय सभागृह, ग्राम कोंढा येथे पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच व सदस्यांचा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल बोलत होते.

खासदार श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले कि, सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार आम्ही नेहमी करतो, आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देण्यात आला. आता विद्यमान सरकारने दिलेला बोनस तुटपुंजा आहे. मागील वर्षीचा 2021- 22 मधील 600 करोड शेतकऱ्यांचा धानाला बोनस ची मंजूर राशी पण ह्या सरकारने दिलेली नाही. मात्र सत्ता असो किव्हा नसो मी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.  या भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सोयी सुविधेकरिता आम्ही सरकार मध्ये असतांना गोसे खुर्द प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा याकरिता राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले होते. मात्र आताच्या सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री पंढरीनाथ सावरबांधे, हिरालाल खोब्रागडे, शैलेश मयूर, अविनाश ब्राह्मणकर, लोमेश वैद्य, विजय सावरबांधे, तोमेश्वर पंचभाई, सुनंदा मुंडले, चेतक डोंगरे, छोटूभाऊ बालबुद्धे, मनोरथा जांभुळे, सुनंदा डडमल, गुड्डू रघुते, सुरेश सावरबांधे, किशोर पालांदूरकर, मनोज कोवासे, जयशीला भुरे, मॅनेज संतलवार, नंदू कुर्झेकर, अनिता मांडवकर, सुनील भाजीपाले सहित नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment