राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष – खासदार प्रफुल पटेल


  • भंडारा येथे खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

भंडारा, दिनांक : २१ जानेवारी २०२३ : पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे कार्य करावे राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष आहे. भंडारा शहराच्या विकासा करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत येणे गरजेचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविल्या तरच आगामी भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करता येईल. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षा प्रती निष्ठावंत व तरुणांना संधी देण्यात येईल, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे मार्गदर्शन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली. खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी विविध विषयावर चर्चा केली.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडुन आणण्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विविध सेल व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. अशी सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी केली.

खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सरीता मदनकर, यशवंत सोनकुसरे, नेहा शेंडे, राहुल निर्वाण, जुमाला बोरकर, हर्षिला कराडे, हितेश सेलोकर, किर्ती कुमरे, राजेश्री राखडे, डॉ. अनिता महाजन, मंजुषा बुरडे, रजिया गेडाम, कविता रंगारी, प्रतिमा मेश्राम, पुण्यशिला कांबळे, जवाहर निर्वाण, अंबादास मंदुरकर, प्रभाकर सपाटे, संतोष श्रीवास्तव, अबु बकर हबीब, गणेश चौधरी, नारायणसिंग राजपूत, भोजराज वाघमारे, डॉ.जगदिश निंबार्ते, धनमाला सोनपिंपळे, बाबुराव बागडे, पंकेश काळे, सुनिल शहारे, रुपेश नंदुरकर मोठया संख्येने शहरातील पदाधिकारीव कार्यकर्ता व आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment