गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी – खासदार प्रफुल पटेल


  • तुमसर येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

तुमसर, दिनांक : २१ जानेवारी २०२३ : तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन गाव विकासाची जबाबदारी सोपावली आहे. या विश्वासाला तडा न जाऊ देता गाव विकासासाठी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी कामाला लागावे. विकास कामात कसलेही राजकारण आड येऊ देऊ नका, गावाच्या विकासासाठी मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे. असा कर्णमंत्र खासदार प्रफुल पटेल यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. ( २० रोजी ) राजाराम लॉन, तुमसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकरी असो की सर्व सामान्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही. सतत प्रयत्न करीत असतो. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात आज घडीला जी हरित क्रांती पाहायला मिळत आहे. हे कोणामुळे सध्या झाले हे सांगण्याची गरज नाही. हे सर्वांना माहिती आहे. औद्योगिक क्रांतीलाही चालना देण्याचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले. मात्र विरोधकांच्या हातात सत्ता गेल्यांनतर ती कामे रखडून पडली आहेत. परिणामी आज जिल्ह्यात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. परंतु गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीही मागे राहणार नाही. याची मी ग्वाही देतो. गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम तुमच्या हातात आहे. यात कोणतीही अडचण आल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत मागे पडणार नाही. म्हणून सरपंच असो कि सदस्य यांनी गावाच्या लहान सहान समस्यांकडे लक्ष केंद्रित करून पुढाकार घ्यावा असाही सल्ला खासदार प्रफुल पटेल यांनी दिला.

यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री नानाभाऊ पंचबुद्धे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, मधुकर कुकडे, प्रशांत पवार, धनंजय दलाल, सुनील फुंडे, देवेंद्रनाथ चौबे, रामदयाल पारधी, देवचंद ठाकरे, विठ्ठल काहलकर, धनेंद्र तुरकर, राजेश देशमुख, राजकुमार माटे, ठाकचन्द मुंगुसमारे, रितेश वासनिक, उमेश तुरकर, योगेश सिंगनजुडे, राजू देशभ्रतार, राजेंद्र ढबाले, सुनील थोटे, गुलराज कुंदवाणी, सदाशिव ढेंगे, विक्रम मनोज टेम्भरे, शरद पारधी, रमेश उईके सहित तुमसर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment