हळदीघाट येथे आमदार चंद्रिकापूरे यांच्या हस्ते गोपालकाल्याचे पुजन


सडक अर्जुनी, दिनांक : १७ जानेवारी २०२३ :  दुर्गामाता देवस्थान हळदीघाट येथे आमदार चंद्रिकापूरे यांनी गोपालकाल्याचे पुजन करून भाविक भक्तांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील ग्रा. प. घाटबोरी येथील दुर्गामाता तिर्थक्षेत्र हळदिघाट येथे श्री जय दुर्गामाती देवस्थान समिती घाटबोरी/हळदीघाट च्या वतीने परमपुज्य गुरूमाऊली अमररत्न तवाडेबाब यांच्या अमृततुल्य वाणीतून ह. प. प. श्री मार्कंडबाबा लंजे यांच्या भजन मंडळासह गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार चंद्रिकापूरे यांच्या हस्ते गोपालकाल्याचे पुजन केले. या कार्यक्रमा प्रसंगी इंजि. यशवंत गणविर जि. प. उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य, गंगाधर परशूरामकर, जिल्हाध्यक्ष रा. कॉ. गोंदिया, अविनाश काशीवार तालुका अध्यक्ष तथा सभापती कृषी उ. बा. स. स. स/अर्जुनी, अश्लेश अंबादे नगरसेवक न. प. , प्रभुदयाल लोहिया, माजी. जि. प. सदस्य छायाताई चव्हान, शेषराव गि-हेपुंजे भाजपा कार्यक्रता स/अर्जुनी, डॉ. वाढई प. स. सदस्य, शिवाजी गहाणे प. स. सदस्य, नाजुक झिंगरे माजी. उपसरपंच घाटबोरी, जग्गनाथ लंजे माजी अध्यक्ष तं.मु.स. घाटबोरी, भागवत झिंगरे अध्यक्ष तं.मु.स. घाटबोरी, एकनाथ झिंगरे माजी. उपसरपंच घाटबोरी/ते., तसेच दुर्गामाता देवस्थान समितीचे अध्यक्ष सुरेश गहाणे, गणपत झिंगरे उपाध्यक्ष, देवाजी बनकर सचिव, श्रीराम झिंगरे कोषाध्यक्ष व अनेक भाविक भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार चंद्रिकापुरे यांनी जनतेला व भाविक भंक्तांना संबोधीत करतांना तिर्थक्षेत्राचे विकासासाठी प्रयत्न करणार आणि भाविक भक्तांना भक्तिचे महत्वावर मार्गदर्शन केले.


 

Leave a Comment