माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट


  • विविध विषयाचे अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन.

नागपूर, दींनाक : 24 डिसेंबर 2022 : राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी आज 23 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्येक भेटुन विविध विषयावर चर्चा करून निवेदन दिले. भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत सर्व विषय मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनानुसार व झालेल्या चर्चेनुसार गोंदिया व गडचिरोली या आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या युवकांसाठी विशेष बाब म्हणून पोलीस व सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावे. गोंदिया व गडचिरोली हे नक्षलग्रस्त जिल्हे असून येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील मानव विकास निर्देशांक अत्यंत कमी आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवकांसाठी पोलीस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागातील सर्व महामंडळाच्या मागील तीन वर्षातील कामाचा आढावा घेऊन बार्टी व समता प्रतिष्ठान या संस्थातील सन 2019-20 ते सन 2022 -23 या मागील तीन वर्षातील कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक लावण्यात यावी. सामाजिक न्याय विभागाच्या अधिनिष्ठ महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळात वरील तीन वर्षात किती लघु उद्योजकांना वित्तीय पुरवठा करण्यात आला. किती बँकांना प्रस्ताव सादर केले. व बँकांनी अनुसूचित जातीच्या किती उद्योजकांना वित्तीय पुरवठा केला. याबाबत आढावा घेण्यात यावा, बार्टी या संस्थेचे मागील तीन वर्षात राबविण्यात आलेले उपक्रम व नियोजित उपक्रमाबाबत आढावा घेण्यात यावा, समता प्रतिष्ठान या संस्थेच्या कामकाजाबाबत आढावा घेणे याबाबतची निवेदन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. या सर्व मुद्द्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून सर्व मुद्दे मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.


 

Leave a Comment