वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 3, 41, 850 रुपयाचा दंड वसूल!


गोंदिया, दिनांक : २४ डिसेंबर २०२२ : वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर विषेशतः विना लायसन्स वाहन चालविणारे वाहन चालक, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्न- कर्कश हॉर्न वाजविणारे , अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलीसांचा ईशारा न पाळणे, ईत्यादि वर कारवाई करून 341 पेड केसेस, 346 अनपेड केसेस अश्या एकूण- 687 वाहतूक कारवाया करण्यात आलेल्या असून 3, 41, 850 रू शुल्क आकारण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वाहतूक पोलीस वाहनावर फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनांचे नंबरप्लेट बदलविण्याची प्रक्रिया राबवून घेत आहेत.

सदरची कारवाई वरिष्ठांचे निर्देश, व आदेशान्वये वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक महेश बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, व पथक यांनी सदरची कारवाई केलेली आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, जनतेनी रहदारीचे व वाहतुकीचे नियम पाळावे. व संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलीस दलास वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी पो. नि. महेश बनसोडे यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व पथकाद्वारे ही कार्यवाई करण्यात आली आहे.


 

Leave a Comment