गोंदिया पोलीस; अवैध वाळू वाहतूक करणारे दोन वाहन जप्त.


सालेकसा : दिनांक : 23 डिसेंबर 2022 : येथील पोलीस पथक यांनी दिनांक 22 डिसेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असतांना सोनारटोला ते गिरोला जाणाऱ्या रोडवर ग्राम बोदलबोडी येथे अवैध रेती वाहतुक करतांना दोन ट्रॅक्टर १) ट्रॅक्टर क्र. MH35G7536 व ट्रॉली विना क्रंमाकाची 2) MH35/AG-1264 व ट्रॉली क्र. MH 35/5918 वाळूची वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर दोन्ही ट्रॅक्टर व रेतीने भरलेली ट्रॉली असा मुद्देमाल ताब्यात घेवुन ट्रॅक्टर पो. स्टे. सालेकसा येथे आणण्यात येवून पुढील कारवाई करीता डीटेन करण्यात आले असून सदर दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीवर तसेच ट्रॅक्टर चे मालक नामे १) राहुल हिरालाल साठवणे वय ३१ वर्ष रा. आमगाव खुर्द सालेकसा, २) रमेश शरद फुंडे वय ५२ वर्ष रा. आमगाव खुर्द, यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत मा. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी सालेकसा यांना पत्र देण्यात आले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक गोंदिया निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया अशोक बनकर यांचे निर्देशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव विजय भिसे यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. सालेकसा चे ठाणेदार स. पो. नि. जनार्दन हेगडकर, पो. शि. अजय इंगळे/2102, चा. पो. शि. अतुल अग्निहोत्री/1686 यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment