लोहिया विद्यालयात जैन मुनी विशुद्ध सागरजी महामुनिराजांचे आगमन


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : 15 डिसेंबर 2022 : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे दिनांक 14 डिसेंबर 2022 ला जैन मुनी विशुद्ध सागरजी महामुनिराज व इतरही मुनीश्री यांचे आगमन झाले. त्यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष लो. शि. संस्था, सुनील फंडे अध्यक्ष दि. भं. डी. म. सह. बँक भांडार, महेश जैन अध्यक्ष अर्बन को. ऑप. बँक, डॉ. भरत अग्रवाल, नरसिंग दास अग्रवाल, पुरुषोत्तम लोहिया, आ. न. घाटबांधे, पंकज लोहिया यांनी मुनिश्रींचे भव्य स्वागत केले. यावेळी दिलीप राऊत, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. विशुद्ध सागरजी महामुनिराज यांनी जीवनावश्यक अनेक गोष्टीविषयी मार्गदर्शन आपल्या प्रवचनातून केले. प्रवचनाचा व त्याच्या दर्शनाचा लाभ मान्यवरांनी, प्रमुख अथितींनी तसेच विद्यार्थी व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी घेतला. जगदीश लोहिया संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व कर्मचार्‍यांच्या वतीने मुनिश्रींच्या विश्रांतीची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली.


 

Leave a Comment