“सौंदड” गावाच्या विकासासाठी “हुकूमशाह” नाही तर सय्यमी सरपंचाची गरज?


  • उर्फट बोलणार्या कथित उमेदवारांना  घरचा रस्ता दाखविण्याची हीच ती वेळ…

सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलु मारवाडे ) : दिंनाक : 15 डिसेंबर 2022 : गावाच्या विकासाचे स्वप्न दाखविणारे अनेक डूप्लीकेट लोक प्रतिनिधी येतात आणि पाच वर्षाचा कार्यकाल भोगल्या नंतर गायब होतात. ते पुन्हा राजकारणात दिसतही नाही. म्हणजे खरा नेता गावाच्या विकासासाठी हवाय. निवडनुक काळात तात्पुरता नमस्कार आणि चमत्कार करणारे आणि निवडणूक जिंकल्या नंतर तुझ्या एकट्या मताने मी जिंकून आलोय का? रे… असे उर्फट उत्तर देणारे लोक प्रतिनिधी कामा पुरता मामा अश्या भुमीकेत असतात.

येवढच नाही तर काही वेळा गावातील मतदारांशी अमोरा समोर भेट झाल्यावर बोलत सुद्धा नाही. एकंदरीत निवडणुकीत ज्या मतदारांनी आपले हक्काचे मत देऊन ज्या सरपंच आणि बॉडीला निवडून सत्तेत आणले ते गावातील सामान्य माणसाला तुच्च नजरेने पाहतात. एवढच काय तर सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर स्वताला गावाचे मालक समजु लागतात. त्या मुळे गावाचा विकास करण्यासाठी हुकूमशाह नाही. तर सय्यमी सरपंचाची गरज आहे अशी “सौंदड” गावात लोक चर्चा आहे.

त्या मुळे गावातील शिक्षित मतदारांनी देखील आपली मत मटण, दारू आणि पाच पन्नास रुपयात न विकता सामान्य आणि लायक मानसाला आपले अमुल्य मत देणे अगदी अपेक्षित आहे. जो लोक प्रतिनिधी निवडणुकीत दारू, मटण आणि पाच पन्नास रुपयात आपली मत विकत घेते. तो तब्बल 5 वर्ष तुमच्यावर हुकूमशाही पद्धतीने राज करते. हे मात्र विसरता कामा नये. सामान्य माणसाला मान सन्मान देणारा आणि कुणी उर्फटून बोलल्यास त्याला सय्यमी रित्या उत्तर देणारा, गावाचा विकास करणारा, कायद्याचे इतंभुत ज्ञान असणारा रुबाबदार सरपंच हवाय. तो धनवान नसला तरी चालेल पण आपल्या लोकांसाठी धावणारा असावा.

जो की पक्ष पात न करता सर्वांना समान नजरेने पाहणारा आणि सर्वांना समजून घेणारा असावा. प्रत्येक ग्राम सभेत गावाचे नियोजन जनतेला सागणारा. आणि वेळेत खर्च देणारा असावा. तो गावात ठेकेदारी करून स्वतःला “जलदुत” म्हणणारा नसावा तर गावात विकास कामे खेचून आणणारा विकास पुरुष असावा, तो कुठल्याही समाजातील अशो, सामान्य माणसाला परवडणारा असावा, संकटाच्या काळात धाऊन येणारा असावा.

कायद्याचा इतंभुत ज्ञान आणि नेत्यांशी जरी ओळख असली तरी त्याचा चुकीचा वापर करून गावातील चुकीच्या विषयाला घेऊन बोलणाऱ्या नागरिकांवर अँट्रोसीटी आणि विनय भांग सारखे गंभीर गुन्हे लावणारा नसावा. गावात तंटे लावणारा नाही तर तंटे मार्गी लावणारा असावा. त्या साठी गावाच्या विकासात मतदारांचा देखील मोलाचा वाटा असतो. म्हणून आपली अमूल्य मत मिट मिरचीच्या किमतीत न विकता किंवा ओबीसी आणि बहुजन या शब्दांचा फक्त निवडणूक पुरता वापर करून मतदारांना इमोशनल करणाऱ्या वेक्तीला ओळखा. उर्फट बोलणार्या कथित उमेदवारांना  घरचा रस्ता दाखविण्याची हीच ती वेळ आहे. त्या मुळे मतदारांनी जागरूक बनून आपली अमूल्य मत लायक विकास पुरुषाला द्यावे. असे शिक्षित आणि जाणकार मतदारांचे मत आहे. गावाचा विकास म्हणजे हाच देशाच्या विकासाचा पाया आहे.


संपादकीय : रुद्र सागर

Leave a Comment