गोंदिया, दिनांक : ०३ डिसेंबर २०२२ : खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने गोंदिया ला मेडिकल कॉलेजची मान्यता देणे व या सारख्या अनेक विकास योजनेच्या माध्यमातून गोंदिया शहराच्या विकासासाठी सदैव कार्य केले आहेत. गोंदिया शहरातील भूमिगत गटर योजनेच्या कामात नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडण्यात आला. गोंदिया शहर व परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन उड्डाणपुलाचे काम केव्हा सुरु होईल याचा अंदाज नाही, शहरात वाहतुकीची कोंडी होते आहे. शहरावासीयांना नियमित पाण्याचा पुरवठा होत नाही. रस्त्यांना स्ट्रीट लाईट ची समस्या कायम आहे. नगर परिषदेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे शहरात घन कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून त्यामुळे दुर्गंधी व नागरीकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी खासदार प्रफुल पटेल सारखे सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे. त्यामुळे गोंदिया शहराच्या विकासासाठी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण साथ द्यावी असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
आज ०३ डिसेंबर रोजी संजय नगर ( गोविंदपूर ) गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते व अशोक सहारे, प्रेम जायस्वाल, मामा बन्सोड, बेबीनंदा बन्सोड याच्या उपस्थितीत पार पडले. माजी आमदार राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, या प्रभागाच्या विकासासाठी योगेश ( मामा ) बन्सोड हे नेहमी कार्य करीत आहेत. आणि या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न व अडी अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. हे कार्यालय प्रभागाच्या राजकीय आणि सामाजिक विकासाला दिशा देणारं तसेच गती देणारं प्रमुख व्यासपीठ बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात पक्ष संघटन व बळकटीचे कार्य करणाऱ्यांना पक्षाच्या वतीने ताकद देण्याचे काम केले जाईल.
यावेळी राजेंद्र जैन यांच्या सोबत अशोक सहारे, प्रेम जायस्वाल, मामा बन्सोड, बेबीनंदा बन्सोड, प्रदीप ठवरे, श्याम चौरे, इरफान सिद्दीकी, जहिदुंनिशा शेख़, धुरपताबाई मेश्राम, शिल्पा शेंडे, पम्मी भोंडेकर, निर्मलाबाई न्यायकरे, मो. शक़ील शेख़, मो.अकील शेख़, रवि कोटागंले, नौशादभाई सत्तार, गणेश बावनथड़े, शोभेलाल बावनथड़े, दुर्गाबाई मेश्राम, प्रशांत गजभिये, मुजीब बेग, अंकित बनसोडे, गेंदलाल मानकर, भोजुभाऊ नेवारे, देवा शेंडे, कवड़ू पेंटर, शैलेश वासनिक, सुनिल पटले, रौनक ठाकुर, प्रमोद कोसरकर, लव माटे, दर्पण वानखेडे सहित कार्यकर्ते व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.