सौदड येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त काकड आरती व नाटकाची परंपरा आजही कायम!


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : २० नोहेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम सौंदड येथे तीन पिढ्यांपासून कार्तिक महिन्यात काकड आरतीची परंपरा जोपासली जात असून मोठ्या उत्साहाने पार पाडली जाते. यात “मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दी चे कारण” या रामदस स्वामीच्या विचारातून जगण्याचे सार सामान्य व्यक्तींना सहजरीत्या समजले आहे. आजही गावातील भाविक मोठया उत्सुकाने पहाटे उठून स्नान करून मंदिरात भजन, गायन, हरिनामाचे जय घोषात आरती करतात.

त्यामुळे मनाला आंतरीक शांती मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतप्रिय जीवनाची गुरुकिल्ली प्राप्त होते. सौंदड येथील सार्वजनिक हनुमान मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावात चालत आलेल्या पंरपराचे प्रेरणास्रोत स्व. परसराम ( मामा ) चांदेवार आहेत. यांचे प्रेरणेतून आजही ही परंपरा सुरू आहे. पहिल्या पिढीतील महारू चांदेवार, नत्थुसाव घाटबांधे, सोमा गायधने, प्रभुदास लोहिया, वासुदेव लाडे यांनी काकड आरतीची परंपरा चालू ठेवली.

आणि आता ही परंपरा तिसऱ्या पिढीत चंद्रकांत चांदेवार, प्यारेलाल चांदेवार, देवेश चांदेवार, निशांत गभणे, अमोल आंबेडारे, निलेश नंदरधने, मेघात निंबेकर, गौरव चांदेवार, जैव डोंगरवार, कृषभ चांदेवार, तन्मय गभणे, देवांशु पांडे, नैतिक चांदेवार, चैतन्य दखने, मंथन गायधने, निहार इरले, भुषण दखने, भावेश चांदेवार, लक्ष्मण चांदेवार, रेहान चांदेवार, कपिल मेश्राम, ज्ञानेश्वर नंदरधने यांनी सुरू ठेवली आहे. हनुमान मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सव भजन मंडळी व बालगोपाल यांनी मोठ्या उत्साहात पार पाडले.

“उठा उठा हो सकळीक वाचेस समरा वाचेस मुख, रिध्दी सिध्दीचा एक एक मुख, एक भव्य तासी” “उठा उठा साधुसंत सादा आपुलेले हीत, गेला गेला हा नर देह, नग कैसा भक्त”, उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, व्यथा जन्माच्या धन द्वारा पुत्रजण, बुध सोयरे सर्व मिथ्या हे जाणून सरणं रे जां देवासी” अशी अनेक भक्तीमय भजने म्हणून कार्तिक पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती केली जाते. पहाटे ३ ते ६  वाजेचा काळ ब्रम्हमुहूर्ताचा काळ असतो. या वेळेश केलेली साधना यर्थात असते. अशी पूर्वापार समज आहे. तसेच कार्तिक पौर्णिमा समारोप प्रसंगी बंजरंग नाट्य मंडळ तेली समाज सौंदड यांचे सौजन्याने “संगीत-प्रतिशोध प्रेमाचा” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. तर मंदिराच्या आयौजकांकडून महा प्रसादाचे आयौजन संपूर्ण गावासाठी दरवर्षी केले जाते.


 

Leave a Comment