लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे चर्चासत्राचे माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती


भंडारा, दिनांक : ०५ नोहेंबर २०२२ :  महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 17/10/2022 चे परिपत्रकान्वये संपुर्ण राज्यात दिनांक 31/10/2022 ते दिनांक 06/11/2022 पावेतो भ्रष्टाचार निर्मुलन संबंधाने दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्याबाबत प्राप्त सुचनान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे भ्रष्टाचाराचा देशाच्या प्रगतीवर होणारा आर्थीक व सामाजिक परिणाम या विषयावर दिनांक 03/11/2022 रोजी भंडारा जिल्हयातील ग्राम पेट्रोलपंप ठाणा येथील कला वाणिज्य महाविद्यालय तसेच ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परसोडी/ ठाणा पे पंप येथे निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली.

त्यात दोन्ही महाविद्यालया मधील एकुण 47 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला, दिनांक 04/11/2022 रोजी पेट्रोलपंप ठाणा जवाहरनगर येथील कला वाणिज्य महाविद्यालय तसेच ओम सत्यसाई कला विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परसोडी/ ठाणा ( पे पंप येथील भ्रष्टाचाराचा देशाच्या प्रगतीवर होणारा आर्थीक व सामाजिक परिणाम या विषयावर उत्कृष्ट निबंध लिहीलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस उपअधीक्षक श्री महेश चाटे सर यांचे हस्ते प्रोत्साहनार्थ रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

दोन्ही महाविद्यालया मध्ये चर्चासत्र दरम्यान 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असुन 06 विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराचा देशाच्या प्रगतीवर होणारा आर्थीक व सामाजिक परिणाम या विषयावर आपले मत मांडले. भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप-अधीक्षक श्री महेश चाटे पोलीस निरीक्षक श्री कमलेश सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराचा देशाच्या प्रगतीवर होणारा आर्थीक व सामाजिक परिणाम या बाबत आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन केले तसेच कोणताही शासकिय अधिकारी कर्मचारी शासकिय काम करीत असतांना आपणास शासकिय शुल्का व्यतिरीक्त ईतर कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी करीत असल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे येवून किंवा कार्यालयाचे दुरध्वनी क्र 07184 252661 /टोल ‘‘फ्री’’ क्रमांक 1064 वर करण्याबाबत आवाहन केले.

Leave a Comment