नवीन स्मार्ट फोन : अवघ्या एक मिनिटात ३ लाख ५०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री


डिजिटल डेस्क : 01 नोहेंबर 2022 :  Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमीने गेल्या आठवड्यात चीनमध्ये Redmi Note 12 सीरीज लाँच केली असून यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कंपनीने आपल्या पहिल्या सेलमध्ये अवघ्या एक मिनिटात ३ लाख ५०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. हा स्मार्टफोन सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. याबाबत कंपनीने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

Redmi Note 12 सिरिज बाजारात दाखल झाली असून, कंपनीच्या नवीन सीरिजमध्ये Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ यांचा समावेश केला आहे. या हँडसेट व्यतिरिक्त कंपनीने Redmi Note 12 Pro Explorer Edition आणि Redmi Note 12 Trend Edition देखील लॉन्च केले आहे. या नवीन Redmi फोनमध्ये १२ जीबी ची रॅम आणि २१० W फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा फोन अवघ्या ९ मिनिटांमध्ये फुल्ल चार्ज होईल.

असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय या फोनमध्ये २०० एमपी पर्यंतचा प्रायमरी कॅमेरादेखील देण्यात आला आहे. Redmi Note 12 5G मध्ये Android 12 आधारित MIUI 13 आहे. याशिवाय Redmi Note 12 मध्ये ६.६७-इंचाचा फुल एचडी सॅमसंग डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस १२०० nits आहे. Redmi Note 12 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राथमिक लेन्स ४८ मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स २ मेगापिक्सल्सची आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 5G मध्ये ३३W फास्ट चार्जिंगसह ५०००mAh बॅटरी आहे.


 

Leave a Comment