“Clean India Campaign” अंतर्गत स्वच्छता जनजागृती रैली.


साकोली, भंडारा, दिनांक : १५ ऑक्टोंबर २०२२  : गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचालित मनोहरभाई पटेल महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी प्राचार्य डॉ. एच. आर. त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात आणि डॉ. किशोर नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र शासनाच्या “Clean India Campaign” १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या अंतर्गत संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ. नूतन चौहान यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील दत्तक ग्राम धर्मापुरी व दुर्गाबाई डोह परिसरात “Clean India Campaign” अंतर्गत स्वच्छता जनजागृती रैली काढली आणि संपूर्ण परिसराला स्वच्छ केले व प्लास्टिक मुक्त परिसर करण्याकरिता ग्रामवासियांना स्लोगन आणि नारे द्वारे तसेच पथनाट्य द्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या.

आपल्या परिसराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता जनजागृती केले. क्यान्सर सारखा गंभीर आजार प्लास्टिक द्वारे मोठ्या प्रमाणात पसरतो आणि त्यापासून बचाव करण्याकरिता ग्रामवासियांना उपाय सांगितले. प्लास्टिकचा वापर टाळावा आणि कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा.
स्वच्छ व सुंदर आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छ वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्याकरिता पथनाट्य आणि स्लोगन या द्वारे गावकऱ्यांना जन जागृतीपर मार्गदर्शन केले. “हम सबका एक नारा स्वच्छ सुंदर हो देश हमारा, सभी रोंगो कि एक दवाई घर में रखो साफ सफाई,” असे नारे देत संपूर्ण धर्मापुरी आणि दुर्गाबाई डोह परिसर स्वच्छ केले. कार्यक्रमाच्या यसस्वीतेकारिता प्रा. विलास शिवणकर, प्रा. दिशांत रंगारी तसेच रासेयो चे सर्व स्वयंसेवक प्रवीण पुस्तोडे, सुमित खुणे, नकुल गहाणे, उत्कर्ष वासनिक, निलेश गायधने, गौरव फुलबांधे इत्यादींनी श्रम दान केले. आणि सर्व स्वयंसेवकांना अल्पाहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 

Leave a Comment