गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास आपली प्राथमिकता असेल – आ. चंद्रिकापुरे


अर्जुनी मोर, गोंदिया, दिनांक: 14 सप्टेंबर 2022 : गावाचा भौतिक, सामाजिक विकास व उत्पन्नाची साधने उपलब्ध करुन देण्यावर भर असेल. गावातील अंतर्गत रस्ते नीटनेटके व सुशोभित असावे यासाठी ग्रामस्थांनी गावाचे नियोजन करून संकल्पना मांडावी. आपण त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

ते मंगळवारी दाभना येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत १० लक्ष रुपये निधीच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जि प सदस्य लायकराम भेंडारकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सरपंच डॉ दीपक रहेले, उपसरपंच चरणदास घासले, ग्रा प सदस्य जगन मेश्राम, प्रतिभा ब्राह्मणकर, रेवता पिहीदे, गीता प्रधान, अरविंद कुंभरे, वनिता मानकर, बंडू सोनवाने व ग्रामस्थ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, शितावरून भाताची परीक्षा होते. गाव सुशोभित व नीटनेटके असेल त्यावरून स्मार्ट गावाची संकल्पना उदयास येते गावात शाळा दर्जेदार असली पाहिजे गावात वाचनालय असावे गावातील तरुण सुशिक्षित युवकांनी आपला अधिकाधिक वेळ वाचनालयातील उपलब्ध पुस्तकांचे वाचन करण्यात घालवला पाहिजे.

हे स्पर्धेचे युग आहे. जो बौद्धिक स्पर्धेत टिकेल त्याचे आयुष्य सुखदायी होईल. युवकांनो, वाचनाची आवड निर्माण करा असा सल्ला त्यांनी दिला. गाव हे सर्वांगसुंदर कसे होईल याचे योग्य नियोजन ग्रामस्थांनी करून त्याचा आराखडा तयार करा. निधी खेचून आणण्यासाठी आपण सहकार्य करु असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थ व महिला भगिनींशी संवाद साधला. गावाच्या विकासासंदर्भात त्यांनी ग्रामस्थांशी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.


 

Leave a Comment