अंगणवाडीतील जेवणात अळ्या, पालकांनी केली संबंधितांवर कारवाई ची मागणी.


  • खैरी/वलमाझरी अंगणवाडी क्रमांक : ७१ येथील प्रकार, ग्रामस्थांचा अंगणवाडी कार्यालयावर हल्ला बोल.   

साकोली, भंडारा, ( साहिल रामटेके ) दिनांक : २६ : साकोली तालुक्यातील ग्राम खैरी/वलमाझरी येथील अंगणवाडीतील बालकांना चुकीने अळीयुक्त खिचडी तोंडात घालत असतांना काही पालकांच्या लक्षात आले. याबाबद कळताच त्वरित सर्व गावक-यांनी अंगणवाडीकडे धाव घेतली. अळीयुक्त जेवनाबाबत चौकशी करीत दुपारी तीन वाजेच्या दरम्यान काही पालक थेट पंचायत समितीत अंगणवाडीतील अळीयुक्त डबे घेऊन पोहचले. सदर प्रकरण २३ ऑगस्ट रोजी समोर आले. जेवणात अळ्या आल्या कुठून.? पोषण आहार कुठे ठेवला होता.?

किती दिवसांपासून पोषण आहाराची स्वच्छता करून धान्य पाखडले की नाही.? असे अनेक संतापजनक प्रश्न पालक करीत होते. या गंभीर प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी असी मागणी पालकांनी केली आहे. चुकीने अळीयुक्त भोजन बालकांनी ग्रहण केले असते व अनावधानाने जिवीतहानीचा धोका झाला असता. याला जबाबदार कोण ? असा संतप्त आरोप देखील सर्व पालकांनी केला असून, अंगणवाडीतील जेवणात अळ्या आढळून आल्या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

साकोली तालुक्यातील ग्राम खैरी/वलमाझरी अंगणवाडी क्रमांक : ७१ येथील हा सर्व प्रकार आहे, गावातील पालक आणि ग्रामस्थांनी अंगणवाडी कार्यालयात या प्र्कानाची माहिती घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान गावातील उप सरपंच सत्यपाल मरस्कोल्हे यांनी प्रकरण शांत केले. दोषीवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.


Leave a Comment