राईस मिलची भिंत आणि टिन शेड पडल्याने ३५ लाखांचे नुकसान.


सौन्दड, ( भामा चुर्हे ) सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : १९ ऑगस्ट २०२२ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस व अतिवृष्टी होत झाली. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो घरांची पडझड झाली आहे. तसेच अनेक घरे व गोठे जमीनदोस्त झाली आहेत. सततच्या संततधार पावसामुळे घरांची वगोठ्याची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मागिल ९ आॅगस्ट पासून १५ऑगस्ट पर्यंत झालेल्या संततधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक गावांतील घरे व गोठे पडून नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे सुरू असून अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक घरे पडत आहेत. अतिवृष्टीमुळे होत असलेल्या घरांच्या पडझडीने अनेक कुटुंबांना दुसऱ्यांच्या घरांचा आसरा घेतला आहे.

झालेल्या संततधार पावसामुळे सौंदड बोपाबोडी येथील महाराष्ट्र राईस मिलची भिंत व टिनाचे शेड पडली, त्यामुळे सामानाचे मोठे नुकसान झाले. राईस मिल गावाबाहेर असल्याने मिल जवळून २०० मी. वर दुधराम लंजे यांचे घर आहे. १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान काहीतरी पडल्याचा आवाज आला असता दुधराम लंजे यांनी घराबाहेर निघून मिल कडे पाहिले तर राईस मिलची भिंत व टिनाचे शेड पडल्याचे दिसले.

त्यांनी मिल मालक प्रभव गिरीधारी अग्रवाल गोंदिया यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली. अग्रवाल बोपाबोडी येथे ५ वाजे दरम्यान येऊन मिलचे सटर उघडून पाहिले असता मशनरीची तुटफुट झाल्याचे दिसून आले. मिल चे भिंत व टिनाचे शेड पडल्याने मशनरीचे जवळपास १५ लाख व घरांचे २० लाखांचे असे एकूण ३५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे अग्रवाल यांनी तलाठी व तहसीलदार यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.


 

Leave a Comment