गोंदिया, दिनांक – १९ ऑगस्ट २०२२ : विजयकुमार गावित मंत्री आदिवासी विकास यांची आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुंबई मंत्रालय येथे १८ रोजी भेट घेऊन अर्जुनी मोरगाव मतदार संघातील विविध आदिवासी विकास विभाग संदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा केली. तसेच विभागातील स्थगिती असलेल्या कामांवरील स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी केली. सदर मागणीवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रथम भेटी दरम्यान आमदार चंद्रिकापुरे यांनी पुष्पगुछ दिले.