श्री कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.


आलापल्ली, दिंनाक: 18 ऑगस्ट 2022 : दि. १६ ऑगस्ट राजी आलापल्ली येथील श्रीराम मंदिर समिती तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून महिलांन व बालकांकरिता धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमात महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा व कृष्णचा माठ सजावट आणि लहान बालकांसाठी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आले.

“माझे कुटुंब ते माझा देश या करीता माझे योगदान” हा विषय महिलांकरीता वक्तृव स्पर्धत ठेवण्यात आले होते. महिलांनि हिरहिरीने वक्तृव स्पर्धेत भाग घेतले व स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्याच महिलांनी उत्कृष्ट वक्तृत्व केले. परीक्षकांच्या परिक्षणांनंतर तिन स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
कृष्णाचा माठ सजावट या स्पर्धेत महिलांना आपल्या घरून माठ सजावट करून आणूंन ते प्रदर्शनात ठेव्हायचे होते.

आणी जास्तीत जास्त महिलांना या स्पर्धेत भाग घेतल्या होत्या व स्पर्धकांनी अप्रतिमपणे माठ सजावट केले होते निरीक्षणनंतर तीन स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. बालगोपालांकरिता दोन गटात राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेन्यात आले आणी दोन्ही गटाकरिता वेशभूषा व त्यांचे सवांद या आधारांवर स्पर्धकांचे निकाल देण्यात आले या दोन्ही गटातील विजयी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले व सहभागी सगळ्याच स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीसे देन्यात आले.

या कार्यक्रमाला आलापल्ली व नागेपल्ली येथील शेकडो महिलांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून सौ सारिका ढवळे,  श्री राऊत सर आणी दिनेश ठीकरे सर यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ जागृती गादेवार यांनी तर संचलन सौ नयना घुटे व सौ काजल पेंपकवार हे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर महिला समिती आलापल्ली हे होते.


 

Leave a Comment