आपकारीटोला येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा, पं. स. सदस्यांचे सत्कार


गोंदिया, दिंनाक: 18 ऑगस्ट 2022 : जि प प्राथमिक शाळा आपकारीटोला येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण भारतात 13,14 व 15 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून जि प प्राथमिक शाळा आपकारीटोला येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी ध्वजारोहण कार्यक्रम संगीताताई खोब्रागडे सभापती प स सडक अर्जुनी यांच्या अध्यक्षतेखाली, शालींदरभाऊ कापगते यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा अलाउद्दीन राजानी, राजकुमार कुसराम माजी अध्यक्ष, धर्मेंद्र मडावी अध्यक्ष, यशवंत सलामे, नेहरू परतेकी, आनंदराव इळपाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

तसेच या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांचा निरोप समारंभ व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. मा संगिताताई खोब्रागडे सभापती सडक अर्जुनी, मा शालींदरभाऊ कापगते उपसभापती, मा.अलाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य, मा मोहनजी बोरकर सरपंच शेंडा, मा ललित डोंगरावार यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच मा राजकुमार कुसराम माजी अध्यक्ष व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापण समिती आपकारीटोला यांचा रुमाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. श्री किशोर बावनकर मुख्याध्यापक यांनी संचालन व प्रास्ताविक केले. शाळेला वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे आभार मानले. शाळेमध्ये लोकसहभागातून विविध प्रकारचे कामे झाल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.

मा शालींदरभाऊ कापगते यांनी शालेय परिसराबाबद समाधान व्यक्त केले आणि कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क केल्यास अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. विध्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेऊन प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांच्या शाळेला होत असलेल्या सहकार्याबद्दल, सर्वांचे आभार व्यक्त केले. अलाउद्दीन राजानी यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनं गावकरी व मुख्याध्यापक यांना दिले.

मोहन बोरकर सरपंच यांनी शाळेला रंग रंगोटी करून देण्याचे आश्वासन दिले. मा संगीताताई खोब्रागडे यांनी शासकीय योजना विषयी माहिती दिली. शालेय परिसर व शालेय स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी धर्मेंद्र मडावी, प्रमोद पंधरे, लक्ष्मण दसरीया, रामदास चीचाम, बबलू सलामे, विनोद पंधरे नीलकंठ उईके तथा समस्त गावकरी व महिला भगिनींनी सहकार्य केले.


 

Leave a Comment