आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी अन्न व नागरी पुरवठा सचिवाची घेतली भेट


गोंदिया, दिं. 22 जुलै 2022 : केंद्र शासनाच्या वतीने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी राज्यात देण्यात आलेली उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांच धान खरेदी झाले नाही. हे उद्दिष्ट पुन्हा वाढवून देण्याची मागणी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विजय वाघमारे यांची भेट करून उद्दिष्ट मर्यादा वाढविण्यासाठी निवेदन दिले.

गोंदिया जिल्हयातील उन्हाळी रब्बी पिकाचे धान खरेदीची मर्यादा वाढवून मिळावी यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार मागणी केंद्र सरकारकडे करुनही दखल न घेतल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकच्याकडे लाखो क्विंटल धान पडून आहेत.

धान खरेदी केंद्राकडून फारथोड्या शेतकऱ्याकडील धानाची खरेदी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याकडे घरी धान पडून असल्याने
पावसाळी पिक घेण्यासाठी शेतकर्‍याकडे पैसा नाही. केंद्र सरकार दखल घेत नाही. म्हणून दिनांक १९ जुलै २०२२ रोजी मुंबई मंत्रालय येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, डॉ. अविनाश काशीवार यांनी सचिव अन्नपुरवठा व नागरिक विजय वाघमारे यांच्येशी भेट करून उन्हाळी रब्बी धान खरेदी ची मर्यादा मुदत वाढीसाठी राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी विनंती केली.


 

Leave a Comment