सडक /अर्जुनी, दिनांक – ३० जून २०२२ – गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका वन विभाग परिसरातून सागवान वृक्षांची अवैध कत्तल मोठ्या प्रमाणात करून चोरी होत अशल्याचे चित्र अनेक वेळा पाहण्यासाठी मिळतात. तालुक्यात २०२२ मध्ये अनेक प्रकरण गाजले, त्या मुळे जिल्ह्यात तालुक्याचा बराच प्रचार झाला आहे. याच प्रकारचे प्रकरण पुन्हा समोर आले आहे, मात्र त्यावर कार्यवाई करण्यात आली आहे.
तालुक्यात दिनांक – २५ जून २०२२ रोजी अवैध सागवान लाकडांची कत्तल करून वाहतूक होत अशल्याचे लक्ष्यात येताच पांढरवांनी येथील महिला बिट गार्ड कुमारी वळवले हे गस्तीवर असतान्हा त्यांनी सदर वाहनाची पाहणी करून कागद पात्रांची मागणी केली. असता ट्रेकटर वाहन चालकाकडे सदर वाहतूक बाबद कोणत्याही प्रकारचे कागद पत्र उपलब्ध नशल्याचे लक्ष्यात आल्याने वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सह्हायक फिरोज खान यांना माहिती दिली.
माहितीच्या आधारे सदर लाकडांची माहिती घेतली असता सदर लाकडे सरकार गट क्रमांक – ८४ असे समोर आले. त्या अनुसंघाने ट्रकक्टर क्रमांक : एम एच ३५ जी ५३१८ आणि लाकूड असा एकूण मुद्देमाल एक लाख अठ्यात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पाच आरोपी नामे: मंगेश वालदे, काशीराम आचले, श्यामलाल उईके, लेगन मरशकोल्हे, मनिराम आचले यांच्यावर महाराष्ट्र वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ [१] [अ] ४१,४२, अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना चवकशी कामी ताब्यात घेतले असून न्यायालयासमोर हजर करणे आहे, तर सदर घटनेचा तपास चालू आहे. असी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रभारी सचिन कटरे यांनी माध्यमांना आज दिली आहे.