तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समिती ची सभा संपन्न.


सडक अर्जुनी, दिनांक 30 जून 2022 – आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी येथे शासनाच्या कृषी विषयक धोरण सुधारण्याकरिता सहाय्य ( आत्मा ) अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताहाचे औचित्य साधून तालुका स्तरीय शेतकरी सल्लागार समिती ( BFAC ) ची सभा एफ आर टी शहा अध्यक्ष ( तालुका शेतकरी सल्लागार समिती ) यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला तालुका कृषी अधिकारी कु. प्रतीक्षा मेंढे यांनी कृषी योजना (१) कृषी संजीवनी मोहीम, २) पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोप वाटिका, ३) महा. डी.बी.टी. अंतर्गत संपूर्ण योजना, ४) पीक विमा योजना, ५) गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, ६) क्षेत्रीय विस्ताराच्या योजना, ७) PMFME योजना व इतर योजने बाबत मार्गदर्शन केले. समितीचे अध्यक्ष एफ. आर. टी. शहा यांनी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचऊन त्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे असे सांगितले.

तसेच समिती मार्फत खालील ठराव घेण्यात आले. ठराव क्र.१) :- प्लास्टिक मलचींग हा घटक शेतकऱ्याला एकदाच एका क्षेत्रावर अनुदानावर देण्यात येतो तो ५ वर्षानंतर सुध्दा त्याच क्षेत्रावर पुन्हा देण्यात यावे. क्र.२) :-  यांत्रिकी करन योजनेअंतर्गत भाजीपाला व फळ पिकांकरिता अनुदानावर कृषी माल वाहतूक गाडी देण्यात यावी. क्र.३) :- उन्हाळी धान पिकाचे पेरणीचे क्षेत्र देत असताना तलाठी यांनी ऊस, भाजीपाला, टरबूज, केळी व इतर पिकाचे क्षेत्राची नोंद सात बारा वर करूनच उर्वरित धान क्षेत्राची माहिती द्यावी पण असे घडत नाही व उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढलेले दिसते परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. सभेला समितीचे सदस्य पुष्पमाला बडोले, रुपचंद पुस्तोडे, वैशाली डोये, मंजुषा तरोने, ममता नेवारे, तसेच के. एस. ब्राह्मणकर, मनोज भालाधरे कृषी पर्यवेक्षक, हे हजर होते. प्रस्तावना व आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक जी. एस. म्हस्के यांनी केले.


 

Leave a Comment