सौंदड गावातून वाळूची अवैध वाहतूक जोमात, कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांना…


सडक/अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 31 मे 2022 : तालुक्यातील 4 ते 5 वाळू घाट लिलाव झाल्याचे वृत्त आहे, मात्र तालुका महसूल  अधिकारी या सर्व प्रकरणातून कोसो दूर असल्याचे मिरवतात, एका कंपनीला हे वाळू घाट मंजुर झाले आहेत अशी देखील माहिती समोर येत आहे, मात्र नियमन बाह्य या वाळू घाटातून काम चालू असल्याचे सांगितले जाते.



तालुक्यातील काही वाळू माफिया या घाटाच्या डंपिंग च्या कामात लागले असून स्वतः या घाटातून नियम बाह्य वाळूचा अवैध उपसा करून परसपर खुल्या बाजारात लोकांना विकत असल्याचे सांगितले जाते, कंपनीच्या काहि अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गोरख धंदा जोमात चालू असल्याची चर्चा नागरिकात आहे.

तालुक्यातील काही कथित अधिकाऱ्यांना प्रती ट्रॅक्टर महिना दहा हजार रुपये असे हप्ते बांधले असल्याचे खुद्द वाहन धारक सांगतात, त्या मुळे कितीही बातम्या पत्रकाराने लावल्या तरी कारवाई होणार नाही असे सांगितले जाते, त्यामुळे नियंत्रण करणारी यंत्रणा सुस्त झाल्याचे आढळून येते, सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार काही घाटांची रॉयल्टी सुद्धा अद्याप आली नाही.

तरी देखील डंपिंग आणि वाहतूक जोमात चालू आहे, सौंदड येथील विशिष्ठ ठेकेदार हा सर्व प्रकार मेणेज करीत आहेत, असे देखील दरम्यान चर्चा आहे, स्थानिक लोक प्रतिनिधी, अधिकारी, आणि कर्मचारी सध्या सायलेंट मोडवर आहेत याचे कारण सगण्या सारखे नाही, वाळू घाटावर नियंत्रण नसल्याने गुंडागर्दी वाढली आहे अश्यात प्रशासना वरील जनतेचा विश्वास राहणार नाही ही सत्यता आहे, विना सीसी टीवी लाऊन वाळूची अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याची चर्चा नागरिकात आहे, यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.


 

Leave a Comment