राष्ट्रीय महामार्गवर उभे वाहन देतात अपघाताला आमंत्रण जबाबदार कोण?


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 31 मे 2022 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 हा नागपूर ते रायपूर असा गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाते अश्यात सौंदड, श्रीराम नगर, फुटाला, सावंगी, बामनी, कोहमारा, सह देवरी पर्यंत मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग उभे वाहने दिसतात.

ही वाहने मुख्य राष्ट्रीय महामार्ग वर पांढर्या रेषेच्या आत उभे असतात, अश्यात राष्ट्रीय महामार्ग वर काम करणारे महामार्ग पोलिसांनी या उभ्या वाहनावर कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र असे दिसून येत नाही.

परिणामी मार्गाने चालणाऱ्या अन्य वाहन धारकांचा अपघात होण्याची भीती बळावत आहे महामार्ग पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. वाहन धारक अनेक वेळा किराणा साहित्य खरेदी करीता किंवा हॉटेल मध्ये जेवणासाठी आपली वाहने मुख्य मार्गावर लावतात, अश्यात उभ्या ट्रॅक मुळे महामार्गावर येणारे वाहन काहीवेळा दिसत नाही परिणामी अपघात होतात.

उभ्या वाहनावर कारवाई होत नसल्याने मुख्य मार्गावर वाहन धारकांचे अतिक्रमण फोफावले आहे. एकंदरीत मुख्य मार्गावरील हॉटेल मालकाकडून महामार्ग पोलिस वसुली अभियान चालवीत असल्याची चर्चा वाहन धरकात चालू आहे, त्या मुळे ही कारवाई केली जात नाही असे सांगितले जाते, महामार्गावर उभ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.


 

Leave a Comment