राजशेखर राणे कृषी सहाय्यक यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार


सडक अर्जुनी, दि. 02 मे 2022 : 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त तसेच गोंदिया जिल्हा स्थापना दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने कृषि विभागात उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते राजशेखर राणे कृषि सहाय्यक बामणी तालुका सडक अर्जुनी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार गौरव करण्यात आला, त्या पूर्वी कृषी मंत्री दादाजी भुसे पाटील यांनी देखील सत्कार केला होता,  कार्यक्रम पोलिस मुख्यालय गोंदिया येथे संपन्न झाला, यावेळी जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक सह अन्य उपस्थित होते, राणे आपल्या परिसरात शेतकऱ्यांना मदत करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वेळोवेळी मदत करीत असतात त्या मुळे ते तालुक्यात चर्चेत आहेत.


 

Leave a Comment