बोपाबोडी; सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विष्णू रोकडे तर उपाध्यक्ष पदी प्रेमलाल कापगते यांची निवड


सडक अर्जुनी, दि. 02 मे 2022 : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बोपाबोडी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया दिनांक 28 एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी विष्णू रोकडे तर उपाध्यक्ष पदी प्रेमलाल कापगते यांची निवड करण्यात आली. तर संचालक म्हणुन प्रशांत कापगते, गोपीचंद भुरे, शामराव नेवारे, वासुदेव शेंडे, राजू कापगते, घनश्याम कापगते, वसंत कापगते , सौ लता लाडे, मनीषा डोंगरवार, यांची निवड करण्यात आली आहे. निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेसह सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन.


 

Leave a Comment