मोटर सायकल चोरी करणारी टोळी पकडण्यात अर्जुनी मोर. पोलिसांना यश!


अर्जुनी मोर, ( संतोष रोकडे ) दी. 18 एप्रिल 2022 :  07 एप्रिल रोजी अर्जुनी-मोर येथील बँक ऑफ इंडिया समोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तात्काळ 103/2022 IPC 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांनी तपासाची चक्रे फिरवली.

अर्जुनी-मोर पोलिसांनी भौतिक पुरावे, तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून 2 आरोपी आकाश कमलाकर पवार व अजय श्रीराम तेलंग रा. गोंदिया यांना अटक केली. अर्जुनी-मोर पोलिसांनी या आरोपींकडून अर्जुनी मोरगाव, वडसा जि. गडचिरोली व नागपूर येथे चोरी केलेल्या अंदाजे 1,00,000 रू किमतीच्या 3 मोटर सायकल हस्तगत केलेल्या आहेत.

गुन्ह्यातील आरोपी यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 20/04/2022 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री अशोक बनकर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम तसेच पोलीस हवालदार रोशन गोंडाणे, राहुल चिचमलकर, प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, श्रीकांत मेश्राम, मोहन कुईकर, गौरीशंकर कोरे यांनी केला आहे. नमुद गुन्ह्याच्या तपासात पोलीस नाईक दिक्षीत दमाहे यांनी तांत्रिक मदत केली.


 

Leave a Comment