संघटन बळकटीकरण करून राज साहेबांचे विचार घरादरात पोचवा – राहुल बालमवार


गोंदिया, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते गोंदिया जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी राहुल बालमवार यांची नियुक्ती झाली असून त्यांचा गोंदिया जिल्ह्यात प्रथम आगमन झाले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी बैठक तसेच कार्यकर्ते यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे मनसे प्रवेश करण्यात आले.

यात मनसे गोंदिया तालुका अध्यक्ष पदी रजत बागडे, मनसे महिला सेना तालुका अध्यक्ष आमगांव पदी सौ. छाया चुटे, महिला तालुका उपाध्यक्ष आमगांव पदी सौ. किरण बोपचे, तालुका उपाध्यक्ष आमगांव पदी सौ. उषाताई लांजेवार, महिला शहर अध्यक्ष आमगांव पदी सौ. योगिता वघारे तसेच तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी राजेश सोनवाने यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राहून बालमवार यांनी राज साहेब ठाकरे यांचे विचार घरादारात पोहोचवणे तसेच गाव तिथे शाखा मोहीम राबवून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागात राजसाहेबांचे विचार सर्वदूर पसरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

दिलेल्या पदांचा योग्य वापर करून मनसेचे विचार प्रत्येक व्यक्ती पर्यंत तसेच संपूर्ण जिल्ह्यात संघटन निर्माण होईल असे कार्य करून राज साहेब काय आहेत आणि पक्षाने आता पर्यंत काय कार्य केले यातून माणसं जोडण्याचे कार्य करण्याचे आवाहन पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले आहे.

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत जिल्हा संपर्क अध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले. या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना भाऊ गवली, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभुषण बैस, आनंद राहुलकर, आमगांव शहर अध्यक्ष बालु वंजारी, वैभव खोब्रागडे, निखिल गडपायले, राहुल बाकरे, रितीक नागपुरे, कुणाल सहारे, व सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment