शिक्षक संघाच्या महिला आघाडीची मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी भेट.


  • अमृता परदेशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी घेतली संघाच्या निवेदनाची दखल.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सडक अर्जुनीच्या महिला आघाडीने दिनांक 23 मार्च 2022 ला मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि. प. गोंदिया यांची भेट घेतली. सडक अर्जुनी अंतर्गत कार्यरत काही शिक्षिका भगिनींनी भविष्य निर्वाह निधी व शासकीय गटविमा वरील लग्नापूर्वीचे नाव बदलविण्यासाठी पंचायत समितीला प्रस्ताव सादर केले होते. पंचायत समिती कार्यालयाने तात्काळ नाव बदलाचे प्रस्ताव वित्त विभाग गोंदिया कडे सादर केले. परंतू बराच काळ लोटूनही कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे आज सडक अर्जुनीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. विमलताई उपरिकर यांच्या नेतृत्वात आपली समस्या मांडण्यासाठी मा अमृता परदेशी यांची भेट घेतली. या प्रसंगी किशोर बावनकर यांनी अमृता परदेशी यांच्याशी चर्चा करून जवळपास 10 महिन्याचा कालावधी होऊनही सडक अर्जुनीच्या प्रस्तावावर कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले.

यावेळी तात्काळ आनंद चर्जे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व देशमुख साहेब वरिष्ठ सहा.(लेखा) यांना बोलावून सादर प्रस्तावावर आज तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशीत केले. त्याचा परिणाम म्हणून आज २३ रोजी सर्वांचे आदेश तयार करण्यात आले आणि पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.

यावेळी सौ करुणा हटकर यांनी समस्या ऐकून तातकाल कार्यवाही सुरू केल्याबाबत अमृता परदेशी यांचे आभार मानले. यावेळी विमलताई उपरिकर अध्यक्ष संघ महिला आघाडी, पी एम मेश्राम, विजय गजभिये, किशोर बावनकर, विजय डोये, तानाबाई गायधने, आशावरी बेंदवार,  इंदुमती आंबेडारे, चहारे मॅडम, करूना हटकर, लता खेकरे, आदी सडक अर्जुनी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment