खंडविकास अधिकार्याना तालुका शिक्षक समिती च्या शिष्टमंडळाची भेट


सडक अर्जुनी, दींनाक : २६ मार्च : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनी च्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन सडक अर्जुनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी वाघाये व गटशिक्षणाधिकारी एस आर बागडे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.चर्चामध्ये सडक अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत शिक्षकांच्या जी पी एफ अपहार प्रकरणी लक्ष घालून न्यायालयात बाजू मांडून शिक्षकांचे सर्व पैसे परत करणे.

सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चिती करिता सेवापुस्तिका जिल्हा परिषद ला पाठविणे, मंजूर झालेल्या कार्यत्तर परीक्षा परवानगी व परीक्षा पूर्व परवानगी , हिंदी मराठी सुट , स्थायी या सर्वांची नोंद सेवा पुस्तकाला अविलंब घेणे , दुय्यम सेवा पुस्तिका अद्यावत करणे, जिल्हा परिषद शाळांचे विद्युत देयक ग्रामपंचायत मार्फत भरणे.

पंचायत समिती स्तरावर कोणतेही प्रकरण प्रलंबित न ठेवता तात्काळ जिल्हा परिषद ला पाठविणे , सेवानिवृत्त होणारे शिक्षक यांचे प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद ला मंजुरी साठी पाठविणे यावर चर्चा झाली
सर्व मुद्दे सोडविले जातील आश्वासन खंडविकास अधिकारी व पंचायत समिती अधिकारावर गटशिक्षणाधिकारी यांनी दिली.

चर्चेत शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार , तालुकाध्यक्ष प्रदीप बडोले , तालुका सचिव महेश कवरे , जे बी कराडे , आनंद मेश्राम , अरविंद कापगते , अभिषेक रंगारी , विलास सपकाळ , सौ हटवार मॅडम उपस्थित होते.


 

Leave a Comment