जुनी पेन्शन करीता; जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना शिक्षक समिती गोंदिया चे निवेदन.


गोंदिया, दींनाक : २६ मार्च : राज्यात 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी या करिता आज संपूर्ण राज्यभर शिक्षक समितीने संबंधित जिल्हाधिकारी यांचे मार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्त केले. यानिमित्त शिक्षक समिती गोंदियाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व अजित पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नावे जिल्हाधिकारी गोंदिया यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे २५ मार्च रोजी दिले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, तालुका अध्यक्ष तथा संचालक नीलकंठ बीसेन, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास हांडगे, जिल्हा संघटक जीवन म्हशाखेत्री, आनंद मेश्राम, एस डी कापगते उपस्थित होते.


 

Leave a Comment