साहेब..! राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे देतात अपघाताला आमंत्रण


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : १० मार्च : सौंदड ते फुटाळा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत, सौंदड ते फुटाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात मुख्य मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने नियमित अपघाताची तीव्रता वाढली आहे, महामार्गावरील पुलावरून फुटाळा कडे उतार आहे, अश्यात वाहने भर धाव वेगाने धावतात परिणामी खड्डे चुकविण्याच्या नादात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तर रात्रीला देखील हे खड्डे दिसत नसल्याने लहान वाहन धारकांना कमालीची कसरत करावी लागते, त्या मुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे.


 

Leave a Comment