अवैध मोहफुलाच्या ०४ हातभटटयावर पोलीसांची कारवाई, ४,६४,७०० चा मुद्देमाल जप्त


गोंदिया, दि. ०९ मार्च : आगामी होळी व धुलीवंदन उत्सवाचे अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अवैध धंदे व गुन्हेगारीत सक्रीय इसमांवर वचक बसावा या दृष्टीने मा. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हेगारी कृत्यास सक्रीय असणाऱ्या तसेच अवैधरित्या हातभटटीची दारू गाळणान्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्या अनुषंगाने दिनांक ०८ रोजी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. बबन आव्हाड यांचे देखरेख व नियंत्रणात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पथक पोलीस स्टेशन तिरोडा हद्दीत शासकीय वाहनाने अवैध धंदयांवर रेड, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीता रवाना होवून ग्राम-सिल्ली परिसरात पेट्रोलींग करीत असतांनी विश्वसनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, नामे संजय सोविंद बरेकर हा निलागोंदी जंगल शिवारात नाल्याचे किनाऱ्यावर मोहाफुलाची हातभटटी लावुन दारू गाळत आहे.

अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीच्या आधारे पंचासह ग्राम निलागोंदी जंगल शिवारात जावुन मोहाफुलाचे हातभटटी दारू बाबत १४.०० वाजता रेड घातली असता आरोपी १) स्वप्नील हंसराज मेश्राम वय ३१ वर्ष रा. भिवापुर, २) सत्यशिल चिंधुजी बन्सोड वय ३४ वर्ष रा. नवेगांव, ३) अंकुश प्रकाश येसणे वय २३ वर्षे रा. भुतनाथ वार्ड तिरोडा हे ०४ हातभटटी लावून मोहाफुलाची दारू गाळत असतांना मिळून आले.

त्यांचे ताब्यातून ४ नग लोखंडी ड्रम, ४ नग कलई घमेले, ४ नग लाकडी टवरे, ४ नग प्लास्टीक पाईप, १ नग प्लास्टीक ड्रम व ७ नग प्लास्टीक डबकी ज्यात एकुण १३० लिटर हा. भ. दारु, २ नग प्लास्टीक चाळया, ४ नग नेवार पटटी, एकूण ५१६० किलो सडवा मोहापास रसायण, १००० किलो जलाऊ काडया असा एकुण किमती ४,६४,७००/- रू चा माल घटनास्थळावर आरोपीतांच्या ताब्यात मिळून आल्याने रितसर कायदेशीर कारवाई करुन वर नमुद आरोपी क्रं. १ ते ३ यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी आरोपी क्रं. ४) संजय सोविंद बरेकर वय अंदाजे ३२ वर्षे रा. सिल्ली याचे सांगण्यावरुन हातभटटी लावुन दारू गाळत असल्याचे सांगितल्याने आरोपी क्रं. १ ते ४ यांचेविरुध्द पो.स्टे. तिरोडा अप क्रं. १८९/२०२२ कलम ६५ (ब) (क), (ड), (ई). (फ), मदाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कारवाई विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली बबन आव्हाड पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे नियंत्रणात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. उपनि संतोष यादव, पो. हवा. चित्तरंजन कोडापे, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, नेवालाल भेलावे, पो.ना. इंद्रजित बिसेन, मपोशि सुजाता गेडाम, चापोशि विनोद गौतम यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.


 

Leave a Comment