वाळूचोरींचे ट्रैक्टर्स तहसिल जमा, महसुल विभागाची पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई


साकोली, भंडारा, दी. २३ : रेती घाट बंद मात्र वाळू चोरीचा सपाटा कायम पाहायला मिळते, काही दिवसापूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन वाहन तर एक मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाई करण्यात आली होती. तर आता  २१ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करीत ५ ट्रैक्टर्स साकोली तहसिल कार्यालयात जमा केल्याने रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

सविस्तर की, उमरी रेतीघाटांवरून सर्रास रेतीचोरींची माहिती महसुल विभागास नागरीकांनी दिली. त्यातच महसुल मंडळ अधिकारी हलमारे, तलाठी ठाकरे, तलाठी हटवार व पोलीस ठाणे निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या चोख बंदोबस्तात ५ ट्रैक्टर्स अखेर तहसिल कार्यालयात जमा केले व दंडात्मक कायदेशिर कारवाईची तरतूद केली.

साकोली तालुक्यातील सर्वच रेतीघाटांवरून दररोज रात्रीपासून ते पहाटेपर्यंत ट्रैक्टरांतून लाखो ब्रॉस टन वाळू चोरली जाते. आता या महसुल व पोलीस विभागाच्या धडक कारवाईने मोठे -मोठे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले असून, आतापर्यंत कोण कोण चोरीचे प्रकरण दाबण्यात सम्मिलीत आहेत, हे आता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या एक्शन कारवाईकडे लक्ष लागलेले आहे.


 

Leave a Comment