विना नंबर प्लेट रस्त्यावर धावणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई करा – तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन


गोंदिया, दिंनाक – २३ : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात विना नंबर चे वाहन रस्त्यावर धावत असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या आशयाचे निवेदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दी. २२ रोजी
पोलिश निरीक्षक डूग्गीपार, पोलिश उप निरीक्षक, महामार्ग तर तहसीलदार, सडक अर्जुनी, यांच्या मार्फत पोलिश अधीक्षक, गोंदिया, जिल्हा अधिकारी गोंदिया, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया पोलिश अधीक्षक महामार्ग नागपूर, यांना देण्यात आले.

निवेदनात सविस्तर नमूद असे आहे की, सडक अर्जुनी तालुक्यामध्ये शासनाची संपत्ती लुटण्याच्या उद्देशाने ( अवैध कामे करण्याच्या उद्देशाने ) काही मोजकी लोक आपल्या वाहनाला नंबर प्लेट लावत नाही, ही वाहने अवैध वेवसाया साठी वापरली जातात असे लक्षात येते, यात दुचाकी वाहन, फोर व्हीलर, ट्रॅक सर्व, ट्रक्ष, टमटम, ट्रॅक्टर व ट्रॉली , जेसीबी, या सारख्या वाहनाचा सर्रास वापर केला जातो, ही वाहने जनावरांची तस्करी, मुरूम , रेती, गिट्टी, उत्खनन व वाहतुकी साठी वापर केला जाते तर अवैध कामावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नजर पाळत ठेवण्यासाठी या वाहनाचा वापर केला जातो.

ही बाब आमच्या लक्ष्यता आली आहे, ही वाहने अधिकाऱ्यांना भेटू नये, व त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये म्हणून असा प्रकार हेतू परस्पर केला जात आहे, ही वाहने मार्गाने भरधाव वेगाने पळविली जातात, अश्यात वाहणा समोर येऊन एखाद्याचा जीव गेल्यास ही वाहने मिळून येत नाही, त्यातच तालुक्यात शेती च्या नावावर सबसिडी घेऊन ही वाहने सर्रासपणे रेती, माती, मुरूम, गिट्टी, वाहतुक करण्यासाठी वापरतात, ( शेती व कमर्शियल ) शासनाच्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन रोड टॅक्स लपविला जाते.

त्या मुळे अन्य शेतकऱ्यांचा देखील मोठा नुक्षांन होत आहे, ही वाहने ग्रामीण भागात ज्यास्त फिरतात, करीता तालुक्यात विना नंबर प्लेट मार्गावर फिरणाऱ्या सर्व वाहनावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे लेखी स्वरूपाचे निवेदन तालुका मराठी पत्रकार संघ सडक अर्जुनी च्या वतीने देण्यात आले, यावेळी उपस्थित अध्यक्ष बबलू मारवाडे, उपाध्यक्ष अश्लेष माळे, सचिव सुधीर शिवणकर , मार्गदर्शक सुशील लाडे , सदस्य वेद परसोडकर व अन्य, यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


 

Leave a Comment