शासनाची मालमत्ता लुटण्यासाठी विना नंबर वाहनाचा सर्रास वापर, कार्यवाई थंडबस्त्यात.


  • अवैध कामे करण्यासाठी तालुक्यातील विना नंबरचे वाहन मोठ्याप्रमाणात कार्यवाई थंडबस्त्यात.
  • शेती वाहनाची सबसिडी घेऊन रेती, माती, मुरूम वाहतुकीत वाहनाचा सर्रास वापर. 

सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ), दी. 20 : जिल्ह्याच्या मध्यभागी असलेला नक्षल ग्रस्त भाग सडक अर्जुनी तालुका आजही विकासा पासून कोसो दूर आहे, मात्र या भागात अवैध कामे तितकीच जोमात होतात, प्रशासन आपल्या पद्धतीने कार्यवाई करते मात्र अवैध कामे करणारी संघटना याला जुमानत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यासाठी मिळते, तालुक्यात मुरूम, रेती, गीट्टटी, लाकूड, जनावरांची तस्करी करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विना नंबर च्या वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

यात जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रॅक, टेम्पो, टमटम, दुचाकी वाहनांच समावेश आहे, रस्त्याने वाहन चालतांही भरधाव वेगात ही वाहने चालतात अश्यात एखादा अपघात झाल्यास ही वाहने मिळून येत नाही, तर अधिकाऱ्यांना चकमा देण्यासाठी विना नंबर च्या वाहनाचा वापर केला जातो, या अवैध वाहनावर आणि वाहन मालकावर वचक बसविण्यासाठी तालुक्यात मोहीम राबविणे गरजेचे आहे.

तालुक्यात धान शेती मोठ्या प्रमाणावर होते, त्या साठी शासन दरवर्षी शेतकऱ्यांना सबसिडीवर वाहन देते मात्र यातील बरीच वाहने अवैध कामात वापरली जातात, त्या मुळे शासनाची टॅक्ष लूट व शेतकऱ्यांची मोठी नुकसान देखील होते, ग्रामीण भागातून ही वाहने चालतात, त्या मुळे संबंधित विभाग देखील यावर पाहिजे तशी कारवाई करीत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगभलं आहे, एकंदरीत ग्रामीण भातील शासनाची मालमत्ता लुटण्यासाठी विना नंबर वाहनाचा सर्रास वापर होत आहे, त्यावर कार्यवाई ची नागरिकांतून मागणी होत आहे.


 

Leave a Comment