राज्याचे नवे पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती.


मुंबई, वृत्तसेवा, दी. १८ : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. संजय पांडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे आणि बराच काळ या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती न करण्यात आल्याने न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. दरम्यान, आता राज्य सरकारने रजनीश सेठ यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी केली आहे.

रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. याशिवाय रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.


 

Leave a Comment