सडक अर्जुनी; नगर पंचायत च्या स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था.


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक – 18 : नगर पंचायत सडक अर्जुनी च्या बाजार वाडीतील स्वछता गृहाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे, बाजार वाडी मध्ये नगर पंचायत कडून नागरिकांना लेट्रिंग आणि बाथरूम, मुतारीची सुविधा लाखो रुपयांची निधी खर्चून इमारत बांधकाम केल आहे, मात्र पाण्याची कमतरता, स्वच्छतेचा अभाव असल्याने विद्रूप चित्र दिसत आहे, स्वच्छता नियमित होत नसल्याने, दुर्गंध सर्वत्र पसरत आहे, शाकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जाते.



त्या मुळे नुसते कागदावर स्वचछतेचे बिल काढण्या पेक्षा जनतेला त्याचा फायदा कसा मिळेल याकडे लक्ष देत नगर पंचायत ने कार्य करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे, नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी या भोंगळ कारभारावर नियंत्रण करणे आवश्यक आहे, दरवाजे, बेसिन, तुटलेल्या अवस्थेत आहे, या ठिकाणी शेकडो नागरिक बाजार करण्यासाठी येतात, इमरजन्सी मध्ये स्वच्छता गृहाचा वापर केला जातो, अश्यात नाकाला रुमाल लाऊन प्रकिया पार पाडावी लागते, त्यातच पाण्याची कमतरता असल्याने स्वछता गृह निकामी झाल्याचे चित्र आहे.



 

Leave a Comment