अबब…! फास्टॅग मुळे तुम्हाला होऊ शकतोय आर्थिक नुकसान


मुंबई, दिनांक ०७ जानेवारी २०२२ – टोल नाक्यांवर नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संपूर्ण देशात फास्टॅग अनिवार्य केले होते. यानंतर बहुतांश सर्व चारचाकी वाहने आणि व्यावसायिक वाहनांमध्ये फास्टॅगचा वापर केला जात आहे. हा फास्टॅग आपल्या बँकेच्या खात्यासोबत लिंक असतो आणि याच्या मदतीने टोलचे पैसे आपल्या खात्यातून कापले जातात. ही यंत्रणा वेळ वाचवणारी असली तरीही जर आपण आपले जुने वाहन विकले असेल आणि आपण आपला फास्टॅग ब्लॉक केला नसेल तर आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर जाणून घेऊया आपण आपले फास्टॅग अकाउंट कसे ब्लॉक करू शकतो.

फास्टॅग हे अधिकृत जारीकर्ता किंवा बँकेकडून खरेदी केले जाते. हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असते. अशावेळी जर तुम्ही गाडी विकताना तुमचं फास्टॅग ब्लॉक केलं नसेल तर वाहनाचा नवीन मालक याचा वापर करू शकतो. जेव्हाही ते वाहन टोलनाक्यावरून जाईल तेव्हा तुमच्या खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. त्यामुळे वाहन विकताना फास्टॅग ब्लॉक करणं अतिशय गरजेचं आहे.

केंद्र सरकारच्या १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केल्यास फास्टॅगशी संबंधित तुमच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल. तसेच, तुम्हाला फास्टॅग अकाउंट बंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सांगितली जाईल. याशिवाय, तुम्ही तुमच्या सेवा प्रदात्याच्या कस्टमर केअरला कॉल करूनही फास्टॅग अकाउंट बंद करू शकता. खालील क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमचे फास्टॅग अकाउंट बंद करू शकता.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – १८० ०२१०० १०४

पेटीएम (PayTm) – १८० ०१२०४ २१०

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) – १८० ०४१९८ ५८५

एचडीएफसी बँक (HDFC Bank) – १८० ०१२०१ २४३

एरटेल पेमेंट्स बँक (Airtel Payments Bank) – ८८० ०६८८ ००६


 

Leave a Comment