केंद्रीय गृह मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना समन्स


दिल्ली, वृत्तसेवा, दिनांक – ०७ जानेवारी २०२२ – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणी गृह मंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना समन्स पाठवलं आहे. केंद्र सरकारच्या ३ अधिकाऱ्यांनी या १३ अधिकाऱ्यांना समन्स पाठवल्याचं वृत्त आहे. न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP), पोलीस महानिरीक्षक (IG) आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना हे समन्स देण्यात आलं आहे.

मोगा, मुक्तसर साहिब, फरीदकोट आणि तरन तारन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांचाही समन्स बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांची फिरोजपूरमधील रॅली रद्द झाली. यानंतर राजकारणाचा पारा जढला आहे. भाजपा पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून काँग्रेसवर निशाणा साधत आहे, तर काँग्रेस भाजपावर मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कांगाव करत प्रपोगंडा करत असल्याचा आरोप करत आहे.


 

Leave a Comment