गोंदिया, देवरी 06: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल निरनिराळे सहशालेय उपक्रम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विषयांतर्गत उपक्रमाच्या माध्यमातुन आनंददायी अध्यापनाचा वापरतुन शिक्षण देत असते. शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक राहुल मोहुर्ले यांनी इंग्रजी विषयाच्या नानाविविध शैक्षणीक साहित्याची जत्रा भरविली यामध्ये वर्ग 4 आणि वर्ग 5वी चे विध्यार्थी सहभागी झालेले होते.
कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहचले नाही त्यामुळे त्यांचे इंग्रजी विषयातील आकर्षण कमी झालेले दिसून आले त्यावर उपाययोजना म्हणून इंग्रजी व्याकरणाला सुलभ करून कसा शिकविता येणार यावर चर्चा करून सदर शैक्षणिक साहित्याच्या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या साहित्याचे इंग्रजी विषयातील शब्दांच्या जाती, काल, एकवचन, अनेकवचन अशा अनेक विषयांवर मॉडेल ,चार्ट तयार करून प्रदर्शन जत्रेत भेट देणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसमोर केले. यामुळे इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांची गोडी निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.
सदर शैक्षणिक जत्रेला मृतरूप देण्यासाठी प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात राहुल मोहुर्ले , विश्वप्रित निकोडे , नितेश लाडे भोजराज तुरकर , नलू टेम्भरे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.