लोहिया विद्यालयात स्व.रामेश्र्वरदास लोहिया यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न


गोंदियासडक अर्जुनी, सौंदड, दिनांक २९ डिसेंम्बर २०२१ – येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ डिसेंबर २०२१ ला ‘ ‘ स्व.रामेश्र्वरदास लोहिया पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश लोहिया, संस्था सदस्य, प्रमुख अतिथी प्रभुदयाल लोहिया, माजी जि. प. सदस्य, कन्हैय्यालाल लोहिया, कोषाध्यक्ष लो. शि. संस्था, जगदीश लोहिया संस्थापक/ संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था, आ. न. घाटबांधे संस्था उपाध्यक्ष , पंकज लोहिया, परेश लोहिया, संस्था सदस्य संदीप लोहिया, थेर सर, मेश्राम सर, शमीम सय्यद, अनिल दीक्षित, लोहिया परिवारातील सन्माननीय महिलावर्ग, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी, पर्यवेक्षिका कल्पना काळे व लोहिया परिवारातील इतर सदस्य यांनी सरस्वती माता , स्व.रामेश्र्वरदास लोहिया व स्व.जमुनादेवी लोहिया यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले.

दोन मिनिटांचे मौन ठेऊन अतिथी, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रामुख्याने प्रल्हाद कोरे, हरणे सर, भजनदास बडोले, महादेव लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सौंदड येथिल रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा ह्या स्व.रामेश्र्वरदास लोहिया व स्व. जमुनादेवी लोहिया यांच्या प्रेरणेने आणि नावाने सुरू आहेत.

स्व.रामेश्र्वरदास लोहिया व स्व. जमुनादेवी लोहिया यांचे सुपुत्र मा.प्रभूदयाल लोहिया, सुरेशकुमार लोहिया, कन्हैय्यालाल लोहिया, जगदीश लोहिया, पुरुषोत्तम लोहिया, दीपक लोहिया यांनी आई वडिलांकडून मिळालेल्या योग्य संस्कारांमुळे विविध क्षेत्रात प्रगती करून परिसरातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन समाजसेवेचे कार्य करीत आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी “आई-वडील यांच्या संस्कारामुळे व परिवाराच्या सहकार्यामुळेच ग्रामीण भागातील शाळेचे संचालन करून उत्कृष्ठ विद्यार्थी निर्माण करून समाजहित तसेच देशहीत करण्याची संधी मिळाली” असे प्रतिपादन केले.

प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मनोज शिंदे, अनिल मेश्राम, थेर सर, पर्यवेक्षिका कल्पना काळे, कू. यु. आर. बाच्छल, टी.बी.सातकर, यांनी स्व.रामेश्र्वरदास लोहिया व स्व. जमुनादेवी लोहिया यांच्या जीवन व समाज कार्याची प्रसंशा करून श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर गीत सादर केले.

कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या विविध कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यगण, शिक्षक -शिक्षकेत्तर – कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात कोवीड -१९ च्या नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स. शिक्षिका कू.यू.बी. डोये यांनी केले तर आभार प्रा. दरवडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ‘ इतनी शक्ती हमे देना दाता ……’या गीताने करण्यात आली.


 

Leave a Comment