“स्वागताध्यक्ष” पदी गौरक्षक, काव्यप्रेमी शंभूदादा पवार यांची निवड


  • सातवे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकव्यसंमेलन “स्वागताध्यक्ष” पदी गौरक्षक,काव्यप्रेमी शंभूदादा पवार यांची निवड

गोंदिया, दिनांक 29 डिसेंम्बर 2021 – नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे च्या वतीने दर दोन वर्षांनी उत्साहात व भव्यदिव्य स्वरुपात अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाचे आयोजन केले जाते. यापुर्वी सहा महाकाव्यसंमेलन यशस्वी केलेली आहेत.

७ वे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या महाकाव्यसंमेलनाचे
” स्वागताध्यक्ष” म्हणुन नुकतचे निवडपञ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेने अभिनंदन केले. गौरक्षक, काव्यप्रेमी, युवा उद्योजक शंभूदादा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सर्वञ आनंद व्यक्त केला जात आहे.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष शंभूदादा पवार म्हणाले की,”सातवे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन २०२२ चे आयोजन दि.१६ व १७ एप्रिल २०२२ रोजी मुपो. कान्हेवाडी (गौशाळा) ता.खेड जि. पुणे दोन दिवस संपन्न होत आहे. याचा आनंद वाटतो. याचे नियोजन अतिशय उत्तमप्रकारे करण्यात येईल. काव्यमंच परिवाराशी मी अनेक वर्ष जोडलेलो आहे. संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. कवींसाठी काम करणारी महाराष्टातील एकमेव संस्था आहे. सर्वांनी या महाकाव्यसंमेलनासाठी उपस्थित राहण्याचे ,मी आपणां सर्व कवींना या निमित्त आवाहान करत आहे.”

या महाकाव्यसंमेलनाचे वैशिष्ट म्हणजे संपुर्ण महाराष्टातुन, खेडेपाडी, वाडी वस्तीतुन, ग्रामीण व शहरी भागातुन कवी कवयिञी मोठ्या संस्थेने उपस्थित राहतात. यात सर्वांना विनामूल्य सहभाग असतो. दोन दिवस संपन्न होणा-या महाकाव्यसंमेलनात सर्वांना चहा, नाष्टा, भोजन, निवास, काव्य सादरीकरण सहभाग विनामूल्य असतो. प्रत्येक कवी, कवयिञी, मान्यवर यांना आदरपूर्वक सन्मानपञ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येते. महाराष्टातुन अनेक कवी कवयिञी या महाकाव्यसंमेलनात उपस्थित राहतात. या आनंद सोहळ्यास अनेक महान व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली आहे.

महाकाव्यसंमेलनाध्यक्ष म्हणुन महाराष्टभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर, कविवर्य प्रा. इंद्रजीत भालेराव, अर्थतज्ञ एस.के. कुलकर्णी, अर्थतज्ञ डाॅ. नरेंद्र जाधव, कविवर्य गीतकार प्रा. प्रविण दवणे, पदमश्री मधु मंगेश कर्णिक , ग्रामिण कवी डाॅ. विठ्ठल वाघ इ.मान्यवरांनी महाकाव्यसंमेलनाध्यक्ष म्हणुन उपस्थिती दर्शवली आहे.

नक्षञाचं देणं काव्यमंच गेली २२ वर्ष काव्यक्षेञात भरीव कार्य करत आहे. कवींना आदर व सन्मान मिळावा यासाठी स्थापन झालेले आहे. हजारो काव्यमैफली, शेकडो कार्यशाळा, काव्यबैठका, काव्यसहली, काव्यसंग्रह प्रकाशन, महाकाव्यसमेलन इ. अनेक उपक्रम सातत्यपुर्वक आयोजन केले जात आहे. या महाकाव्यसंमेलनाचे संयोजन व आयोजन नक्षञाचं देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थापक राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी दिली.


 

Leave a Comment