राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या छायाताई चव्हाण यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 29 डिसेंम्बर 2021 – जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ओबीसी आरक्षण राखीव जागांवर सर्वसाधारण गटातून होणाऱ्या निवडणूक संदर्भात आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पांढरी जि. गोंदिया येथे पार पडली.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. छायाताई चौहान यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. या बैठकीमध्ये विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, बाळाभाऊ अंजनकर, विजय शिवणकर, शेषराव गिर्हेपुंजे, सौ. रचनाताई गहाणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विकास बागडकर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment