उद्या संतप्त शेतकऱ्यांचा सौन्दड विधुत कार्यालयावर मोर्चा


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक 09 – दिनांक: 01 डिसेंम्बर 2021 – रोजी कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी. कार्यालय सौंदड यांना स्थानिक शेतकऱ्यांनी रेल्वे स्टेशन ते नवतलाव या दरम्यान असणाऱ्या शेत जमिनी कडील शेती पंपाना 24 तास विद्युत पुरविण्या बाबद निवेदन सादर केले होते, मात्र त्या निवेदनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाई न केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उध्या दिनांक 10 रोजी स्थानिक mscb कार्यालयावर मोर्चा काढून घेराव करण्याचे ठरविले आहे.

दिनांक 01 रोजी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी काय मागणी केली होती त्यावर एक नजर टाकू या, आम्ही रेल्वे स्टेशन ते नवतलाव सौंदड या दरम्यान असलेले शेतजमीन मोटार पंप धारक शेतकरी आम्हाला पुर्वी 24 तास विद्युत पुरवठा होत होता परंतु आता काही महिण्या पुर्वीपासून या परीसरातील 4 ट्रान्सफार्मरला फक्त 8 तासच विद्युत सुरू ठेवली जाते.

आम्हाला पुर्वी प्रमाणे 24 तास विद्युत मिळाली पाहीजे कारण सौन्दड गावातील इतर भागातील ट्रान्सफार्मरला 24 तास विद्युत पुरवठा होत आहे.

फक्त आम्हालाच 8 तास विद्युत पुरवठा का देण्यात येत आहे. फक्त आमच्यासाठीच सरकारने जि.आर. काढला आहे काय ? बाकीच्या गावासाठी नाही का ? तसे असल्यास आम्हाला माहिती द्यावी व जि.आर.ची प्रत आम्हाला देण्यात यावी. आम्हाला पुर्वीप्रमाणे 24 तास विद्युत पुरवठा न झाल्यास आम्ही शेतकरी दि. 10/12/2021 रोज शुक्रवारला

सौंदड येथील पावरहाऊसला घेराव टाकुण पावरहाऊस पुर्णताः बंद करू याची दखल घ्यावी. व याच्यात काही झाल्यास पुर्णतः जबाबदारी एम.एस.ई.बी. कार्यालयांची राहील. तिव्र आंदोलन करण्यात येईल. आम्ही याच्यापुर्वी सुध्दा आपल्या कार्यालयास निवेदन सादर केलेला होता. पण आम्हाला काही माहिती देण्यात आलेली नाही. आम्ही एम.एस.ई.बी.च्या म्हणन्यानुसार पुर्णपणे बिल भरलेला आहे. तरी पण आम्हाला 24 तास विज पुरवठा देण्यात यावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

सदर पत्र मा. नितीन राऊत, उर्जा मंत्री महा. राज्य, विद्युत कार्यालय, देवरी, विद्युत कार्यालय, सडक/अर्जुनी, विद्युत कार्यालय, गोंदिया, सरपंच, ग्रामपंचायत सौंदड, पोलीस स्टेशन, डुग्गीपार यांना देण्यात आले असुन शेतकरी  देवेन्द्र सदाशीव शीवनकर, बेमिचंद ओळगुजी बिसेन, बळीराम ईरले, खुशाल धनिराम ब्राम्हणकर, व शालिकराम उरकुडा किरनापुरे यांची नावे आहेत.


 

Leave a Comment