नक्षल बंद च्या पार्श्वभूमीवर, 2 ट्रॅक्टर ची जाळपोळ


गडचिरोली, वृत्तसेवा, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 – एका वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार नक्षल्यांनी आज 27 रोजी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर काल भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील मुरूमबुशी जवळ रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टरांचा जाळपोळ केल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि १३ नोव्हेंबर ला गॅरापत्ती कोटगुल जंगपरिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते,  त्याच्या निषेधार्थ आज नक्षलांकडुन बंद चा आवाहन करण्यात आला होता, त्याच पार्श्वभूमीवर काल भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील मुरूमबुशी जवळ ररस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टरांचा जाळपोळ नक्षलयांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

Leave a Comment