भारतिय संविधानामुळे झालेला महिलांचा विकास हाच खरा प्रत्येक समाजाचा विकास – आ. मनोहर चंद्रीकापूरे


  • केशोरी येथे संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा.

गोंदिया, अर्जुनी मोर, गोंदिया, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 – 
तालुक्यातील केशोरी येथे संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक अर्जुनी मोर क्षेत्रातील आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, प्रकाशभाऊ गहाने माजी सभापती जी.प. गोंदीया, सहउदघाटक योगेश नाकाडे अध्यक्ष राकाॅ अर्जुनी मोर, श्रीकांत घाटबांधे उपाध्यक्ष जी. काॅ. गोंदीया, अध्यक्ष कशिफ जमा कुरेशी माजी सभापती कृ.ऊ.बा.स. अर्जुनी मोर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभूजी राजगडकर, ताराबाई पाटील, विलासभाऊ भोंगाडे, समीक्षा गणवीर भूषण शेंडे उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करुन पूजन करण्यात आले. नंतर सर्वांनी मिळून संविधान पुस्तीकचे वाचन करण्यात आले. वाचनानंतर शपथ विधी घेण्यात आली. डॉ. भीमराव आंबेडकरांनी जी अपल्याला घटना प्राप्त करुन दिली त्या घटनेमधूनच देशाचा कारभार चालतो सर्वात महत्त्वाचे की संविधानामुळे जो महिलांचा विकास झाला त्यामुळेच प्रत्येक समाजाचा विकास हा घडून येतो.

असे प्रतिपादन आमदार चंद्रिकापुरे यांनी जनतेला केले. नंतर बोलले की हिन्दु कोटबिल हाच खरा पर्याय की त्यामुळे महिलांचा विकास होत गेला हिन्दु कोटबिल याबदधल रितसर माहिती त्यानी आपल्या भाषनातूण जनतेला दिली. अपल्याला दिलेला संविधानात सर्व जातिधर्माबद्धल आरक्षण देण्यात आलेले आहे, आणि त्याचा सर्व समाज बांधवांना फायदा होत आहे, असे आमदार चंद्रिकापुरे यांनी आपलया भाषणातून व्यक्त केले.

कार्यक्रमाला सर्व समाजातील महिला, पुरुष हे जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध खाद्य पदार्थ तसेच फळांची सुद्धा दुकाने लावण्यात आली होती. यशस्वीतेसाठी संध्या लोथे, मयुरी काळे, सरिता तीरघम, मनिषा ताराम, ज्योती मडावी, सर्थिका आळे, अस्मिता साखरे, करुणा कराडे, सरिता लंजे, मंजूषा उइके, हर्षा ठाकरे, मंगला राणे, यांनी परिश्रम घेतले तर एकता मंडळ केशोरी, आदिवासी गोवारी युवक संघटना, समर्थ स्पोर्ट क्लब अरततोंडी, सिद्धार्थ युवा फाऊंडेशन केशोरी यांनी सहकार्य केले.


 

Leave a Comment