BREAKING NEWS – माजी मंत्री बडोले यांच्या निकटवर्तीयांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.


गोंदिया, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 – आज गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी च्या सभेत प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन प्रदेश महासचिव आ. अभिजीत वंजारी, आ. सहसराम कोरेटे, जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड, प्रदेश महासचिव एन डी किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, पी जी कटरे आणि तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधि राजेश नंदागवळी , जिल्हा महासचिव दामोदर नेवारे, राजु पालिवाल, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, शहर अध्यक्ष अनिल राजगीरे इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत भाजप चे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे निकटवर्तीय सड़क अर्जुनी बाजार समिति चे संचालक रोशन बडोले व डव्वा आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आनंद जोशी यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला, कार्यक्रम भोला भवन गोंदिया येथे सम्पन्न झाला. रोशन बडोले व आनंद जोशी यांच्या पक्ष प्रवेशा बद्दल राजा भाऊ गुब्रेले, वामेश्वर टेंभरे ,किरण हटवार, किशोर शेंडे, दिनेश हुकरे, सविता कापगते, सिन्धु बारसागडे, ठामेन्द्र तुरकर , कमलेश मुंगुलमारे, योगेश यळे ,मो. हुशेन युसुफ पटेल, विस्मय बडोले यांनी अभिनंदन केले.


 

Leave a Comment